Podcast Cover

कल्पक भारत

  • प्रिया बोडके - शेतीकडे उद्योग म्हणून बघा, ओझं म्हणून नको!!

    31 AUG 2019 · प्रियाला मी पुण्यात भेटले. ही विशीतली मुलगी अगदी आत्मविश्वासाने आपल्या आई वडिलांच्या शेतीच्या व्यवसायाला पुढे नेताना दिसली. जसं आज आपण ईशा अंबानींबद्दल ऐकतो आणि वाचतो तसंच ह्या होतकरू शेतकरी उद्योजिकेचे विचार जाणण्याची उत्सुकता माला वाटली. ह्या घेतलेल्या तिच्या मुलाखतीतून ते विचार तुमच्यापर्यंत पोचवावे असंही तेवढ्याच प्रखरतेने वाटलं. आज गावात अनेक लोकं आपल्या जमीनी विकताना दिसतात. वाईट वाटतं. पण प्रिया सारखे शेतकरी आज गावागावातील ते चित्र बदलू शकतात असंही वाटतं. पूर्ण मुलाखत अवश्य ऐका. तुमचे विचार आणि प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद.
    Played 21m 51s
  • विभावरी पंडित - परिस्थितीवर मात करण्याची अद्भुत शक्ती

    31 JAN 2019 · आपल्या अध्यात्मिक, वैचारिक आणि प्रामाणिकपणाच्या ताकदीवर सौ. विभावरी पंडित ह्यांनी शालेय शिक्षण नसतानाही एक यशस्वी उद्योग उभारला आहे. त्यांची मुलं आज इंटरनेट आणि डिजिटल युगात तो त्याच ताकदीने पुढे नेता आहेत. त्यांचे विचार खूप प्रेरणादायी आहेत. रेकॉर्डिंगच्यावेळी त्यांची तब्येत थोडी बरीनसल्याने मध्ये-मध्ये आवाजाची गुणवत्ता तेवढी व्यवस्थित रेकॉर्ड झालेली नाही. पण तरिही ही मुलाखत तुमच्यापुढे आणायचं धाडस करते आहे कारण आज पंडितकाकूंसारखे उद्योजक सरकारकडे नोकऱ्या नाहीत म्हणून हातावर हात धरून बसत नाहीत. ते एक स्वालंबी भारत घडवतायेत.
    Played 8m 20s
  • कल्पक भारत - भारत घडवणाऱ्या माणसांच्या शोधात !!

    27 JAN 2019 · सरकार देश घडवतं की जनता ? माझ्या मते देशातली जनता ही आपल्या कल्पकतेने देश घडवत असते. सरकारचा त्यात फारतर २०-३०% वाटा असेल. आपल्या मेहनतीने, कल्पकतेने आणि जिद्दीने भारत देशाला घडवत असलेल्या भारतातील आणि भारता भाहेर राहणाऱ्या भारतीयांच्या शोधात आज पासून मी निघणार आहे. ह्या प्रवासात श्रोते म्हणून तुमची साथ आणि तुमच्या प्रतिक्रिया मिळत राहतील अशी अशा करते. जय हिंद!!
    Played 1m 49s
देश हा देशाचे नागरीक आपल्या कल्पकतेने आणि महत्त्वाकांक्षेने घडवत असतात. कल्पक भारत ही शृंखला अशाच भारतीय आणि जगभरातल्या भारतीय मुळाच्या नागरिकांना, त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कामाला तुमच्या समोर आणणार आहे. तुमची साथ आणि तुमच्या प्रतिक्रया ह्या प्रकल्पाला अधिकाधीक प्रगल्भ बनवत राहतील अशी अशा करते.
Information
Author Shweta Aroskar
Categories Society & Culture
Website -
Email -

Looks like you don't have any active episode

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Current

Podcast Cover

Looks like you don't have any episodes in your queue

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Next Up

Episode Cover Episode Cover

It's so quiet here...

Time to discover new episodes!

Discover
Your Library
Search